वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २०. देवभक्तांचा संवाद

हो तुम्ही कृपावंता ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088938 · अभंग क्र. ११७१

1171.
हो तुम्ही कृपावंता ।
किती आता विनवावे ॥१॥
न दयाचि काही प्रत्युतर ।
ऐसे निष्ठुर केवि तरी ॥२॥
नेणो दासाचा त्रास आला ।
दिसे मांडिला अव्हेर ॥३॥
काय करुणाचि हारविली ।
विपरीत झाली दशा दिसे ॥४॥
निळा म्हणे म्हातारपण ।
आले दारुण नुठवेसे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग