तांपीचिये तीरी मह्तग
1180.
तांपीचिये तीरी मह्तग्राम थोर | असे सोमेश्वर पुरातन ॥१॥
वद्य वैशाख मास दशमी निर्मळ | उष्णकाळ फार तापतसे ॥२॥
तेथ परशुरामे मारियेला बाण | पाहती पुरातन पश्चिमेस ॥३॥
पाहिले माय आम्ही तापीतीर | उतरले भार वैष्णवांचे ॥४॥
धन्य तापीतीर दिसे मनोहर | दोही थडी भार पताकांचे ॥५॥
नामा म्हणे हरी आवडीचे स्थळ | कण्हेर कमळ उदय जाला ॥६॥
