नामे पावन इये लोकी ।
1183.
नामे पावन इये लोकी । नामे पावन परलोकीं । नाम सदा ज्याचे मुखी । धन्य तो नर संसारी ॥१॥
नामे कलिमल दहन । नाम पतीतपावन । नाम दीनोद्भारण । नाम जनार्दन वदता ॥२॥
नाम गाता सुख वाटे । प्रेमे प्रेम ते कोंदाटें । एका जनार्दनी भेटें । नाम गाता निश्चये ॥३॥
