वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 157. मुक्ताबाई समाधी

उघडिल्या दिशा उघडिले

🙏 4. संत नामदेव · ABH-081816 · अभंग क्र. ११८९

1189.
उघडिल्या दिशा उघडिले गगन | पाहिले वदन भास्कराचे ॥१॥
निवृत्तिराजाते कळवळा वाटे भारी | आता आम्हा हरि आज्ञा द्यावी ॥२॥
जयजयकारे टाळ्या पिटिती सकळ | नाचती गोपाळ तापीतीरी ॥३॥
सकळांचे चित्ती येतो कळवळा | मुक्ताई डोळा पाहिली नाही ॥४॥
तानापरि खेद करिती योगेश्वर | लाविती पदर डोळिंयांसी ॥५॥
नामा म्हणे देवा कैसे आता कांही | आम्हा मुक्ताई बोलली नाही ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग