वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 156. चांगदेव महाराज नमन

भूचरी खेचरी चांचरी न

🙏 4. संत नामदेव · ABH-081884 · अभंग क्र. ११६९

1169.
भूचरी खेचरी चांचरी निश्चळा | अगोचरी डोळा स्थिरावली ॥१॥
झाकली समाधी संतसज्जनांनी | तुलसी पुष्पे वरूनि वर्षताती ॥२॥
निवृत्तीची मिठी विठोबाच्या गळा | आणिकांच्या डोळा अश्रू येती ॥३॥
केले समाधान विठ्ठल रखुमाईने | निवृत्ति म्हणे राहणे काय आता ॥४॥
गेले योगिराज राहिले ठायी ठायी | आता मुक्ताई जाईल की ॥५॥
स्वरूपींचे ओघ जातील स्वरूपी | नामा म्हणे निरोपी पांडुरंग ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग