वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २०. देवभक्तांचा संवाद

देव म्हणे भक्तहो काह

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088921 · अभंग क्र. ११६९

1169.
देव म्हणे भक्तहो काही तरी घ्यारे ।
ते म्हणती उरे शीणचि घेता ॥१॥
याल तरि नेईन वैकुंठलोका ।
ते म्हणती नका बंदीखान ते ॥२॥
रिध्दिसिध्दी देईन तुम्हा ।
ते म्हणती आम्हा विटाळ तो ॥३॥
विचारी देव करावे कैसे ।
कैवल्याही ऐसे नेघो म्हणती ॥४॥
आता आवडेल तरी ते मागा ।
देईन सांगा जीवीचे ते ॥५॥
निळा म्हणे ह्रदयी ध्यान ।
दयाहो जीवन नाम तुमचे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग