उदित कमळे नानावर्ण स
1183.
उदित कमळे नानावर्ण सुंदर | फुलले तरुवर नानारूपे ॥१॥
श्वेतपीतरक्त भ्ररमर रुणझुण | होताती श्रवण वैष्णवांसी ॥२॥
गुंजारव भ्रमती रत्नकीळा फांकती | मनोहर दिसती सुरवरांला ॥३॥
तरुवर गगनी अंकुरले भारी | विजा ते कोंदल्या बहुतांपरी ॥४॥
गंधर्व गायने आलापित सुस्वरी | केले स्पष्ट नयनी गुह्य गौप्य ॥५॥
नामा म्हणे देवा मन जाले स्थिर | पडियेला विसर अविद्येचा ॥६॥
