आमुच्या स्वस्थानी ना
1185.
आमुच्या स्वस्थानी नाही पा अंधार | अवघी चराचर प्रकाशत्वे ॥१॥
उदयु आणि अस्तु नाही स्वरूपासी | ऐसे मुनि ऋषि जाणताती ॥२॥
आम्ही कधी आलो स्वरूप सोडोन | जावे पालटीन जेथिल तेथे ॥३॥
अंतर बाहेर स्वामीचे स्वरूप | स्वये नंदादीप उजळिला ॥४॥
वद्य वैशाखमासी दशचे दिवशी | गेले ते स्नानासी तापीतीरी ॥५॥
नामा म्हणे गोविंदा मनोहर पद्मनाभा | अंकुरला गाभा विराटाचा ॥६॥
