वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

नामे पावन हीन याती ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086500 · अभंग क्र. ११७५

1175.
नामे पावन हीन याती । नाम जपती अहोरात्री । नामापरती विश्रांती । दुजी नाही प्राणियां ॥१॥
नका भ्रमुं सैरावैरा । वाउगे तप साधन पसारा । योग याग अवधारा । नामे एका साधतसे ॥२॥
व्रत तप हवन दान । नामे घडे तीर्थ स्नान । एका जनार्दनी मन । स्थिर करुनि नाम जपा ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग