वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

जोडोनिया धन उत्तम वे

🙏 3. संत तुकाराम · ABH-078940 · अभंग क्र. ११७८

1178.
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे । उदास विचारे वेच करी ॥१॥
उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥धृपद॥
परउपकारी नेणे परनिंदा । परस्त्रीया सदा बहिणी माया ॥२॥
भूतदया गाईपशूचे पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी ॥३॥
शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्त्व वडिलांचे ॥४॥
तुका म्हणे हेचि आश्रमाचे फळ । परमपद बळ वैराग्याचे ॥५॥

अर्थ :
जो मनुष्य उत्तम उद्योग धंदा करून धन कमवितो आणि त्याचा विनियोग चांगला, उत्तम करतो त्याच मनुष्याला उत्तम गती मिळेल. आणि तो उत्तम जन्माला येऊन पुन्हा सुख भोगेल. जो मनुष्य केव्हाही परनिंदा करत नाही आणि परस्त्री व परनारी यांना आई, बहीण यांच्या समान मानतो व सर्वावर परकर करतो, तसेच जो सर्व प्राणिमात्रांना वर नेहमी दया करतो, गायी सारखेच इतर प्राण्यांचे पालन पोषण करतो आणि आडराणी तहानलेले जीवांना पाणी पाजतो, जो शांत राहून कोणाचे मन दुखवत नाही कोणाशीही वाईट वागत नाही तो आपल्या वाडवडिलांचे महत्त्व वाढवितो. तुकाराम महाराज म्हणतात आदर्श युक्त गृहस्थाश्रमा साठी हेच फळ आहे आणि वैराग्याचे हेच परम बळ आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग