समाधीशी शेजे घातली म
1168.
समाधीशी शेजे घातली मनोहर | बसविले वर चांगदेव ॥१॥
|आनंदाने टाळया पिंटिति वैष्णवभार | लाविती पदर डोळियासी ॥२॥
टाळ मृदंगाचा जाला झणत्कार | गेले योगेश्वर समाधीसी ॥३॥
सांडिली भूषणे भस्म आभरणे | जाले निमग्न परबह्मी ॥४॥
झाकियले नेत्र उन्मनीच्या संगे | निवृत्ति पांडुरंग ओसंडले ॥५॥
नामा म्हणे जाला समाधिस्थ योगेश्वर | निघाले बाहेर देवभक्त ॥६॥
