देवभक्त यांची एकरुपत
1180.
देवभक्त यांची एकरुपता
आमोद न सोडी कर्पुर ।
किंवा प्रभेते रविकर ॥१॥
तैसेचि देव आणि भक्त ।
येरयेरी विराजित ॥२॥
जेवि साखरेते गोडी ।
चंदन सौरभ्या न सोडी ॥३॥
निळा म्हणे अवकाश नभ ।
दोन्ही एकचि ते स्वयंभ ॥४॥
1180.
देवभक्त यांची एकरुपता
आमोद न सोडी कर्पुर ।
किंवा प्रभेते रविकर ॥१॥
तैसेचि देव आणि भक्त ।
येरयेरी विराजित ॥२॥
जेवि साखरेते गोडी ।
चंदन सौरभ्या न सोडी ॥३॥
निळा म्हणे अवकाश नभ ।
दोन्ही एकचि ते स्वयंभ ॥४॥