भक्तिं भावचि बांधिला
1170.
भक्तिं भावचि बांधिला गाठी ।
आला उठाउठी देव तेथे ॥१॥
म्हणे मज घ्या सोडायसी ।
ते म्हणती ठकिसी नेघो तुज ॥२॥
लटिकीच माया धरिशील रुपे ।
लपशील खोपे रिघोनिया ॥३॥
न सोडू भाव जांई तू आता ।
विनवी देवभक्ता काकुळती ॥४॥
भावही घ्यारे भक्तिही घ्या रे ।
मजही घ्यारे तुमचाचि मी ॥५॥
निळा म्हणे साधिले काज ।
भक्तिं आपुली पैज जिंकियेली ॥६॥
