पूजियेली तापी पूजिला
1191.
पूजियेली तापी पूजिला सोमेश्वर | उठावले भार वैष्णवांचे ॥१॥
कांही कोणावरी नाही पडले ओझे | कष्टी निवृत्तिराज होत असे ॥२॥
आली गेली कसी आम्हा कळले नाही | कोठे मुक्ताई विसर्जिली ॥३॥
नामा म्हणे देवा उठवा ऋषीश्वरा | निवृत्तीचे करा समाधान ॥४॥
