ऋषि म्हणती हरि पातले
1188.
ऋषि म्हणती हरि पातलेसे विघ्न | आता कैसे प्राण वाचतील ॥१॥
कोणाचिया शुद्धि नाहींचिया कोणा | म्हणती नारायणा मृत्यु आला ॥२॥
कडाडली वीज निरंजनी जेव्हा | मुक्ताई तेव्हा गुप्त जाली ॥३॥
वैकुंठी लक्ष घंटा वाजती एकघाई | जाली मुक्ताई स्वरूपाकार ॥४॥
एक प्रहर जाला प्रकाश त्रिभुवनी | जेव्हा निरंजनी गुप्त जाली ॥५॥
गेले निवारूनी आकाश अभूट | नामा म्हणे कोठे मुक्ताबाई ॥६॥
