वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

जातीची शिंदळी । तिला

🙏 3. संत तुकाराम · ABH-078979 · अभंग क्र. ११७२

1172.
जातीची शिंदळी । तिला कोण कैसा वळी ॥१॥
आपघर ना बापघर । चिंती मनी व्यभिचार ॥धृपद॥
सेजे असोनिया धणी । परद्वार मना आणी ॥२॥
तुका म्हणे अस्सल जाती । जातीसाठी खाती माती ॥३॥

अर्थ :
जी जातिवंत व्याभीचार करणारी स्त्री आहे तिला जरी सांगितले की “व्यभिचार करू नये”. तिला त्यापासून दूर करण्याचा प्रयत्न कोण करेल कारण ती कोणाचेही ऐकणार नाही. ती तिच्या घरी असो किंवा बापाच्या घरी असो तिच्या चिंतनात नेहमी व्याभिचारच असतो. त्या स्त्रीचा पती जरी तिच्या जवळ झोपलेला असला तरी तिचे चित्त परपुरुषा विषयासक्त असते. तुकाराम महाराज म्हणतात तीच खरी अस्सल व्यभिचारी जातीची आहे कारण “जातीसाठी खाती माती” म्हणजे तिला लोक जरी नांव ठेवत असले तरी तिचा स्वभाव ती सोडत नाही म्हणजे ती अस्सल व्यभिचारी आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग