टाळ विणे मृदंग सुस्व
1186.
टाळ विणे मृदंग सुस्वर गायन | कोंदले गगन दाही दिशा ॥१॥
प्रळयींच्या विजा वर्षती अपार | जाला धुंधकार दाही दिक्षा ॥२॥
करोनिया स्नान बैसले बाहेर | म्हणती अंधकार फार जाला ॥३॥
झंझाट सुटला वारा कापू लागे धरा | नभचि अंतरा कालवले ॥४॥
नामा म्हणे देवा जाली कैसी गती | पडलीसे भ्रांति अवघ्या जना ॥५॥
