नामे तारिले पातकी ।
1186.
नामे तारिले पातकी । नाम थोर तिही लोकी । नामे साधे भुक्ति मुक्ति । नाम कलीं तारक ॥१॥
नको जाऊ वनांतरीं । रानी वनी आणि डोंगरी । बैसोनियां करी । स्थिर चित्त निमग्न ॥२॥
नामे साधले साधन । तुटले बहुतांचे बंधन । एका जनार्दनी शरण । नाम वाचे उच्चारी ॥३॥
