पाहिली गे माय पूर्वभ
1177.
पाहिली गे माय पूर्वभूमि आपुली | बहुत सन्मानिली वैष्णवांनी ॥१॥
चैत्रमास शिवरात्र उत्सव आगळा | जावे पा वेरुळा घृष्णेश्वरा ॥२॥
दशमीचे दिवशी निघाले बाहेर | उठावले भार वैष्णवांचे ॥३॥
वेरूळ नगर असे पुरातन | विश्वकर्मा याने कीर्ति केली ॥४॥
अगाध ते पुण्य बोलताती ऋषि | जावे वेरुळासी नामा म्हणे ॥५॥
