साधन सोपे नाम वाचे ।
1170.
साधन सोपे नाम वाचे । पर्वत भंगती पापाचें । विश्वासितातें साचे । नाम तारक कलियुगी ॥१॥
अहोरात्र वदता वाणी । ऐसा छंद ज्याचे मनी । त्याचेनि धन्य ही मेदिनी । तारक तो सर्वांसी ॥२॥
एका जनार्दनी नाम । भाविकंचें पुरे काम । अभागियांतें वर्म । नव्हे नव्हे सोपारें ॥३॥
