वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 157. मुक्ताबाई समाधी

निवृत्तीने एकांत केल

🙏 4. संत नामदेव · ABH-081809 · अभंग क्र. ११८४

1184.
निवृत्तीने एकांत केला मुक्‍ताईशी | गमन कोणे दिवशी आरंभिले ॥१॥
मुक्ताई म्हणे जावे यावे कोठे | अवघे निघोट स्वरूप स्वामी ॥२॥
गर्जता गगन कडाडली वीज | स्वरूपी सहज मिळयेली ॥३॥
मावळला दीप ज्योत कोठे होती | सहज सामावती निरंजनी ॥४॥
नामा म्हणे हरि जाईल पाहता | ऐसे माझे चित्ता कळो आले ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग