ज्ञानेश्वरा तुम्ही
1190.
ज्ञानेश्वरा तुम्ही निरविले सोपान | केली बोळवण पांडुरंगा |॥१॥
तो आम्ही उत्सव पाहिलासे डोळा | चांगोबांचा सोहळा दाविला हरी ॥२॥
होती ऐसी नाही जाली मुक्ताई | संत तया ठायी स्फुंदताती ॥३॥
रम्य स्थळ म्हणोनि राहिले एक मास | युगा ऐसे दिवस क्रमियेले ॥४॥
अर्ध मास वैद्याख अर्ध मास ज्येष्ठ | फार होती कष्ट निवृत्तिराजा ॥५॥
मुक्ताई मुक्त केली केशवराजा | तामा म्हणे पूजा तापीतीरा ॥६॥
