वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 157. मुक्ताबाई समाधी

मुक्ताई उदासी जाली अ

🙏 4. संत नामदेव · ABH-081805 · अभंग क्र. ११७८

1178.
मुक्ताई उदासी जाली असे फार | आता हे शरीर रक्षू लये ॥१॥
त्यागिले आहार अन्नपाणी सकळी | निवृत्तिराज तळमळी मनामाजी ॥२॥
गंधर्व सुरगण उठले सहमेळा | गेले ते वेरूळा अवघेजण ॥३॥
वेरुळाचा महिमा सांगे हृषिकेशी | जवा आगळी काशी म्हणोनिया ॥४॥
वेरुळाची यात्रा केली यथासांग | मग पांडुरंग निघते जाले ॥५॥
चालिले श्रीरंग वैष्णवांचे भार | पाहावे तापीतीर नामा म्हणे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग