तेथोनि वैष्णव आले ने
1173.
तेथोनि वैष्णव आले नेवाशासी | सहसमुदायेंसी देवराव ॥१॥
म्हाळसेलागी पूजा केली असे निगुती | राहिले दहा रात्री हृषिकेशी ॥२॥
येथोनि चलावे पुढती शारंगधरा | जावे टोकेश्वरा स्तानालागी ॥३॥
चहू युगा आदि स्थळ पुरातन | आले नारायण गोदातीरी ॥४॥
नामा म्हणे येथे रहावे हृषिकेशी | विजयादशमीशी सिद्ध होऊ ॥५॥
