मायभूमि पाहू यांची आ
1175.
मायभूमि पाहू यांची आम्ही डोळा | चलावे गोपाळा सहजासहज ॥१॥
भक्त त्र्यंबकपंत मूळ पुरुष आदि | तयाची समाधि आपेगांवी ॥२॥
आपेगांवी आले देव ऋषीवर | उतरले भार वैष्णवांचे ॥३॥
धन्य यांचे कुळ घ्य यांचा वंश | धन्य यांचे कुशी योगिराज ॥४॥
नामा म्हणे आम्हा दाविले नारायणे | जाली चौघीजणे याचि क्षेत्री ॥५॥
