परेसी न कळे पार । पश
1189.
परेसी न कळे पार । पश्यंतीसी निर्धार । मध्यमा तो स्थिर वैखरीये ॥१॥
चहुं वाचा कुंठीत । ऐसे नाम समर्थ । आम्ही गाऊ सदोदित । सोपे नाम ॥२॥
ऋद्धिसिद्धि धांवे पायी । मुक्तिसे तो अवसर नाही । मुक्तीचा तो उपाय काही । हरिदास ॥३॥
एका जनार्दनी भाव । भावंचि तुष्टे देव । आणीक नको उपाव । नाम स्मरे ॥४॥
