वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 157. मुक्ताबाई समाधी

निवृत्तिराज म्हणे आत

🙏 4. संत नामदेव · ABH-081821 · अभंग क्र. ११७९

1179.
निवृत्तिराज म्हणे आता पंढरिनाथा | मुक्ताईला जपा अवघेजण ॥१॥
वेधली चित्तवृत्ति स्वरूपी निमग्न | नाही देहभान मुक्‍ताईला ॥२॥
अवघेजण जपती जपे नारायण | चालती घेऊन मध्यभागी ॥३॥
निवृत्तिराजे धरिली मुक्ताई हाती | सांभाळित जाती निशिदिनी ॥४॥
पदोपदी जपे निवृत्तिराज करे | आणिक ऋषीवर सांभाळिती ॥५॥
नामा म्हणे देवा जाता तातडीने | पुढे स्थळ कोण नेमियेले ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग