आचमन करुनि आले सिद्ध
1171.
आचमन करुनि आले सिद्धेशवरा | हरि ऋषीइवरा आर्जविती ॥१॥
निवृत्ति मुक्ताईला त्यागू नये कोणी | आता उत्तरायणी गमन करू ॥२॥
पांच दिवस उत्सव केला चांगदेवा | विश्वाचा विसावा श्रीहरी ॥३॥
वैष्णवांनी समाधि बांधली साजिरी | सुवर्णाचा वरी पिंपळ तो ॥४॥
केला नमस्कार वैष्णवांनी जेव्हा | मुक्ताई तेव्हा वोसंडली ॥५॥
नामा म्हणे देवा तीर्थक्षेत्र चांगले | चित्त मन रंगले चांगयाचे ॥६॥
