वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 158. निवृत्तीनाथ समाधी

.श्री निवृतीनाथ महार

🙏 4. संत नामदेव · ABH-081523 · अभंग क्र. ११९२

1192
.श्री निवृतीनाथ महाराजांची समाधी.

निवृत्तिराज म्हणे भले केले देवा | आता जी केशवा सिद्ध व्हावे ॥१॥
निवृत्तिदास म्हणे सहजासहज हरी | बोळविली सारी सुखधामा ॥२॥
दाही दिशा चित्त जाले असे सैरा | आता शारंगधरा सिद्ध व्हावे ॥३॥
आता माझे श्रम नको घेऊ हरी | जावे त्र्यंबकेश्वरी समाधीसी ॥४॥
पार माझा प्राण आला असे कंठी | आता जगजेठी सिद्ध व्हावे ॥५॥
नामा म्हणे देवा दिवस नाही आता | त्वरे वेगी संता सिद्ध करा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग