शुद्ध फाल्गुन मासी व
1172.
शुद्ध फाल्गुन मासी वैष्णव हृषीकेशी | पंचमीचे दिवशी सिद्ध जाले ॥१॥
निवृत्तिराज म्हणे जावे म्हाळसापुरी | जेथे ज्ञानेश्वरी पूर्ण जाली ॥२॥
उठावले भार देवऋषीश्वर | केला नमस्कार समाधीसी ॥३॥
सव्यहाते क्षेत्र घेतले वंष्णवांनी | चालली विमाने नेवाशासी ॥४॥
नामा म्हणे देव निघाले बाहेर | कीर्तन गजर पुढे होती ॥५॥
