सदा नामे घडे आचार ।
1188.
सदा नामे घडे आचार । नामे साधें सर्व विचार । नाम पवित्र परिकर । सादर वदनी घेता ॥१॥
शुद्ध वैराग्य घडे नामी । तप तीर्थ घडे निष्कामीं । दान धर्म पुण्यपावन इये धर्मा । नाम वाचे आठविता ॥२॥
नामे साधे अष्टांग पवन । नामे साधे पंचाग्रि धूम्रपान । नामे एका जनार्दनी भजन । नामे पावन देह होय ॥३॥
