भ्याला देव देखोनि भक
1168.
भ्याला देव देखोनि भक्ता ।
म्हणे मी आता केउता पळो ॥१॥
जीवेसीचि इही केली साठी ।
सांडविता मिठी न सोडिती ॥२॥
भुक्ति मुक्ति देतो यासी ।
परि हे उदासी न घेती त्या ॥३॥
निळा म्हणे भक्ती मोकलिता आशा ।
देवचि फासा पडिलो म्हणे ॥४॥
