सोनियाची झाडे अनेक क
1182.
सोनियाची झाडे अनेक कर्दळी | त्यांत रानकेळी फोफावल्या ॥१॥
सिताफळी भरित अवघी तापीथडी | दाट दिसती गाढी रामफळे ॥२॥
तापीतीरी ऋषि आणि शारंगधर | पाठीमागे भार वैष्णवांचे ॥३॥
|धन्य महतनगर धन्य सोमेश्वर | धन्य तापीतीर योगियांचे ॥४॥
उष्णकाळी छाया आवंडती फार | म्हणती ऋषिश्वर रम्य स्थळ ॥५॥
नामा म्हणे देवा रंगले अंत:करण | उतरती विमाने गंधर्वांची ॥६॥
