पशु पक्षी वनचरे । श्
1171.
पशु पक्षी वनचरे । श्वान श्वापदादि सुकरे ॥१॥
पडता नाम घोष कानी । पावन होती इये जनी ॥२॥
चतुष्पाद आणि तरुवर । नामे उद्धार सर्वांसी ॥३॥
उंच नीच नको याती । ब्राह्मणादी सर्व तरती ॥४॥
एका जनार्दनी अभेद । नामी नाही भेदाभेद ॥५॥
