वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २१. देवभक्त यांची एकरुपता

ध्यानी चिंतनी मानसी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089105 · अभंग क्र. ११८६

1186.
ध्यानी चिंतनी मानसी ।
हरिते ध्याता अहर्निशी ।
तोचि होऊनिया भक्तरासी ।
झाले विठठलिं विठ्ठल ॥१॥
कीटकी भृंगी ऐशी रुप ।
तीव्र ध्याने ते तद्रुप ।
विष्णु जेवी शिवस्वरुप ।
शिवहि विष्णु चिंतने ॥२॥
नर तोचि नारायण ।
अर्जुनरुपे विलसे कृष्ण ।
येरे येरे विराजमान ।
करिता ध्यान तद्रुपता ॥३॥
निरसोनिया अविदयाजात ।
देव तैसेचि झाले भक्त ।
मोहममता कामातीत ।
जाले सतत निजध्यासे ॥४॥
निळा म्हणे अर्धनारी ।
रुप विलसे नटेश्वरी ।
दोनि दाउनी एक शरीरी ।
दोघा नाही दोनिपणे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग