निवृत्तिराज म्हणे प्
1187.
निवृत्तिराज म्हणे प्रळयींचा वारा | सुटला शारंगधरा ऐसे वाटे ॥१॥
हालते गगन डोलती विमाने | गेले देहभान अवघियांचे॥२॥
अवघियांचे डोळे झाकले एकट | माध्यान्ही अभूट वळूनि आले ॥३॥
निवृत्ति पांडुरंग राही रखुमाई | धरा म्हणती घाई मुक्ताईला ॥४॥
नामा म्हणे केशवा जाहला उबाळा | कांही केल्या डोळा उघंडो नेदी ॥५॥
