नाम पावन पावन । नाम
1179.
नाम पावन पावन । नाम दोषांसि दहन । नाम पतीतपावन । कलीमाजी उद्धार ॥१॥
गाता नित्य हरिकथा । पावन होय श्रोता वक्ता । नाम गाऊनि टाळी वाहता । नित्य मुक्त प्राणी तो ॥२॥
एका जनार्दनी नाम । भवसिंधु तारक नाम । सोपे सुगम वर्म । भाविकांसी निर्धारे ॥३॥
