फुलले अनेक तंरुवर ते
1181.
फुलले अनेक तंरुवर तेथ | दुर्वा दर्भ आंत डवरले ॥१॥
करंज जांभळी लागली एक थाटी | वरी बहु दाटी तरुवरांची ॥२॥
अमृतफळे अपार विस्तारले फार | त्यामाजी मयूर टाहो देती ॥३॥
कंठ कोकिळा त्या सुस्वर गायन | तरुवर सुमने परिमिळते ॥४॥
पारिजातकांची दाटी थाटी जाली भारी | आते मैलागिरी डुल्लताती ॥५॥
नामा म्हणे देवा भला हा एकांत | मार्कडेये येथे तप केले ॥६॥
