तुझे निजसुख तुजपाशी
1384.
तुझे निजसुख तुजपाशी आहे विचारूनि पाहे मनामाजी ॥१॥
विवेक वैराग्य शोधुनिया पाहे | तेणे तुज होय ब्रह्मप्राप्ती ॥२॥
ज्ञानाचा प्रकार सहजची जाला | अहंभाव गेला गळोनिया ॥३॥
खेचर विसा म्हणे जेथे ओंकार निमाला | सहजचि जाला ब्रह्ममूर्ती ॥४॥
