वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

घ्यावी तरी घ्यावी उद

🙏 3. संत तुकाराम · ABH-078864 · अभंग क्र. १३९२

1392.
घ्यावी तरी घ्यावी उदंड चि सेवा । द्यावे तरी देवा उदंड चि ॥१॥
ऐसी कैची आम्ही पुरती भांडवले । आल्या करी बोले समाधान ॥धृपद॥
व्हावे तरी व्हावे बहुतचि दुरी । आलिया अंतरी वसवावे ॥२॥
तुका म्हणे तुझे सख्यत्व आपणी । अससील ॠणी आवडीचा ॥३॥

अर्थ :
देवा तू तुझ्या भक्तांकडून भरपूर सेवा करून घे आणि भक्तांनाही तू भरपूर द्यावे. आमच्याकडे असे कोणते पुण्याचे भांडवल आहे की तू आम्ही आल्यावर आमचे गोड बोलून समाधान करतोस. देवा तू दूर गेला की फार दूर जातो नाहीतर जवळ आल्यानंतर एकदम अंतकरणात येऊन राहतोस. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्याशी सख्यत्व करणे फारसे अवघड नाही तुझ्याशी अनन्य भक्तीने ज प्रेम करतो त्यांचा तू स्वतः ऋणी होतोस.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग