कीर्तनाची मर्यादा कै
1378.
कीर्तनाची मर्यादा कैसी । देव सांगे उद्धवासी ॥१॥
गावें नाचावें साबडें । न घालावेंकोडें त्या कांही ॥२॥
मिळेल तरीं खावें अन्न । अथवा पर्णे ती भक्षुन ॥३॥
जाईल तरी जावो प्राण । परी न सांडोवे कीर्तन ॥४॥
किर किर आणू नये पाठी । बोलु नये भलत्या गोष्टी ॥५॥
स्वये उभा राहुन । तेथे करी मी कीर्तन ॥६॥
घात आलिया निवासी । माता जैसी बाळावरी ॥७॥
बोले उद्धवासी गुज । एका जनार्दनी बीज ॥८॥
