देव म्हणे नाम्या विस
1378.
देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी | शरण तयासी जावे वेगी ॥१॥
इतुके ऐकोनि नमियेले देवा | चालयेला तेव्हा विसोवापाशी ॥२॥
चिताग्रस्त नामा आला आवडचासी | पुढे देऊळासी देखियेले ॥३॥
नामा तये काळी गेला देऊळासी देउळी कौतुकासी देखियेले ॥४॥
