वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

कीर्तनाची आवडी देवा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086001 · अभंग क्र. १३८३

1383.
कीर्तनाची आवडी देवा । वैकुंठाहुनी घाली धांवा ॥१॥
नवल वैकुंठीच नसे । तो कीर्तनी नाचतसें ॥२॥
भाळ्याभोळ्यासाठी । धावे त्याच्या पाठोपाठी ॥३॥
आपुलें सुख तया द्यावे । दुःख् आपण भोगावे ॥४॥
दीनानाथ पतीतपावना । एका जनार्दनी वचना ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग