भक्ति त्रिविधा षड्वि
1392.
भक्ति त्रिविधा षड्विध नवविधा यजन याजने जीवाते दंडिताती सदा ॥१॥
केशव परमात्मा नेणोनि याजी पतिते | पतनी पडता होती भूते रया ॥२॥
नाही रूप स्थिति नाही शब्दस्थिति नित्य तया वस्ती निरंजनी ॥३॥
एकले परब्रह्म गुरुमुखे जाणावे | तरि चुकवावे पुनरावृत्ति रया ॥४॥
ऐसे रे नामया वचन ऐक पुढे हे तो देवाविषयी श्रुतीचे निवाडे ॥५॥
श्रुती नेती परतोनि आलिया | खेचर पुढे सांगे नामया ॥६॥
