वचने चि व्हावे आपण उ
1386.
वचने चि व्हावे आपण उदार । होईल विश्वंभर संपुष्ट चि ॥१॥
सत्यसंकल्पाची फळे बीजाऐसी । शुद्ध नाही नासी पावो येत ॥धृपद॥
वंचिलिया काय येतसे उपेगा । शरीर हे नरकाचे चि आळे ॥२॥
तुका म्हणे जीव जिता थारे लावा । पडिलिया गोवा देशधडी ॥३॥
अर्थ :
आपण आपल्या वाणीने विश्वंभरा चे नाम घेण्याविषयी उदार व्हावे. त्यामुळे विश्वंभर आपल्यावर नक्कीच संतुष्ट होईल. आपले संकल्प शुद्ध आणि सत्य असेल तर त्याचे फळ सत्य मिळते आणि जे शुद्ध आणि सत्य आहे ते केव्हाही नाश पावत नाही. आपले शरीर म्हणजे नरकाचे आळेच आहे आणि ते हरीच्या सेवेत लावले नाही तर त्याचा काय उपयोग आहे. तुकाराम महाराज म्हणतात याकरिताच मी तुम्हाला सांगत आहे की जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमचा देह तुम्ही हरिभजना कडे लावा जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला चौर्यांशी लक्ष योनी च्या फेऱ्यात गुंतावे लागेल.
