सुरवर इच्छा करिती त्
1392.
सुरवर इच्छा करिती त्यांची ।
नित्य हरिभक्तांची भेटावया ॥१॥
म्हणती धन्य हरीचे दास ।
सर्वदा उदास देहभावी ॥२॥
दर्शने यांच्या सर्वही सिध्दी ।
तुटती उपाधी जन्ममरणे ॥३॥
निळा म्हणे वैकुंठवासी ।
रंगला प्रेमासी यांचिया ॥४॥
1392.
सुरवर इच्छा करिती त्यांची ।
नित्य हरिभक्तांची भेटावया ॥१॥
म्हणती धन्य हरीचे दास ।
सर्वदा उदास देहभावी ॥२॥
दर्शने यांच्या सर्वही सिध्दी ।
तुटती उपाधी जन्ममरणे ॥३॥
निळा म्हणे वैकुंठवासी ।
रंगला प्रेमासी यांचिया ॥४॥