भवजलधि अगाध तरावया द
1389.
भवजलधि अगाध तरावया दुस्तर रचिले पंढरपूर चंद्रभागा ॥१॥
तारू पंढरिनाथ मोलेंविण उतरितु | उगला असे तिष्ठतु वाट पाहे ॥२॥
बुडतयाचे भय नाही संसारी | कलिमाजी पंढरी नाव थोर ॥३॥
राव रंक दोन्ही बैसवुनी वरी उतरी पैलतीरी भरंवसेनी ॥४॥
आठराही आवले जे नावेसि लागले | साही खण भरले मिरवताती ॥५॥
चौमुखी वर्णिता नकळे याचा पार | वेदा अगोचर सहस्रमुखा ॥६॥
सडियाते कांसे लावित आपण | कुटुंबिये जाण नावेवारी ॥७॥
प्रेमाचे पेटे बांधोनिया पोटी | उतरी जगजेठी पैलपारु ॥८॥
आप आंगे उघाडी बुडत्याते कडे काढी | ऐसे लक्षकोडी तारियले ॥९॥
सहस्र नाम पेटे बांधे मज पोटी | तरी जगजेठी लावी कांसे ॥१०॥
आदि करोनी सर्वही तारिले | उतरूनि तारिले पैलतिरी ॥११॥
ऐसे पक्षी कीट गुल्मल तारिले | खेचर विसा म्हणे तारी माते पुंडलिक ॥१२॥
