अनाथांचा नाथ तुझी श्
1377.
अनाथांचा नाथ तुझी श्रीदावली | मज कारे जाळी भवव्यथा ॥१॥
देव म्हणे नाम्या गुरुवांचुनिया | मुक्ति पावावया आन नाही ॥२॥
आन नेणे कांही करिसी वित्पत्ती | नव्हे माझी प्राप्ती गुरुविण ॥३॥
जाई नाम्या जाई गुरूसी शरण | तुटे भवबंधन तुझे वेगी ॥ | ४ ॥
नामा म्हणे देवा कवणा शरण जाऊ | कोणा मी होऊ शरणागत ॥५॥
