देवावरी पाये ठेउनि ख
1379.
देवावरी पाये ठेउनि खेचर | निजेला परिकर निवांतचि ॥१॥
देखोनिया नामा पावला विस्मया | कैसा हा प्राणिया देवो नेणे ॥२॥
उठी उठी प्राण्या आंधळा तू काये | देवावरी पाय ठेवियेले ॥३॥
विसोबा खेचर बोले नामदेवा | उठविले जिवा कांरे माझ्या ॥४॥
देवाविण ठाव रिता कोठे आहे | विचारूनि पाहे नामदेवा ॥५॥
जेथे देव नसे तेथे माझे पाय ठेवी पा अन्वय विचारुनी ॥६॥
नामा पाहे अवघा जिकडे तिकडे देव कोठे रिता ठाव न देखेची ॥७॥
