वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

मेलियांच्या रांडा इि

🙏 3. संत तुकाराम · ABH-079325 · अभंग क्र. १३६९

1369.
मेलियांच्या रांडा इिच्छती लेकरू । लाज नाही धरू प्रीती कैशी ॥१॥
मागिलां पुढिलां एकी सरोवरी । काळाची पेटारी खांदा वाहे ॥धृपद॥
आन दिसे परी मरण चि खरे । सांपळा उंदिरे सामाविली ॥२॥
तुका म्हणे जाली मनाची परती । निवळली ज्योती दिसो आली ॥३॥

अर्थ :
ज्यांचे नवरे मेले आहे त्या स्त्रिया लेकरू व्हावे अशी इच्छा करतात. त्यांना त्याविषयी मोह धरावा याची त्यांना लाज कशी वाटत नाही. पती जिवंत असताना केलेला व्यवहार, गेल्यानंतर केलेला व्यवहार जर सारखाच होऊ लागला तर त्या स्त्रियांचे वागणे म्हणजे काळाच्या पेटीवर बसून काळाच्या खांद्यावर जाण्यासारखे कृत्य आहे. उंदीर जसा आपले घर समजून बिळात शिरतो, पण त्यात त्याचे त्यात खरे मरण असते. तुकाराम महाराज म्हणतात ज्या वेळी विषयापासून मन परत येते त्याच वेळेस आत्मज्योति आपल्याला दिसून येते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग